Ads block

Geography for mpsc and other state pcs


 १) भारत स्थान व विस्तार

भारत : भारताला प्राचीन काळात आर्यवर्त, भारत ,हिंदुस्तान, इंडिया या नावाने ओळखले जायचे.

आर्यवर्त हे नाव आर्यवंशीय लोकांच्या निवासावरून पडले.

भारत हे नाव भारत वंशीय राजाच्या भूमीवरून पडले

इंडिया हे नाव सिंधू नदीच्या काठावरील ग्रीकांना इंडोई आणि पारशी यांना हिंदू संबोधले असल्यामुळे याचा उल्लेख हिंदुस्तान किंवा इंडिया असा करण्यात आला.

भारताचे स्थान:  

  • पृथ्वीच्या पूर्व गोलार्धात भूकेंद्र असलेले भारत आशियातील एक महान राष्ट्र
  • जगातील सर्वात मोठे लोकशाही असलेले एक संघ देश
  • अक्षवृत्तीय विस्तार ८ ४'२८" उत्तर ते ३७ १७'५३" उत्तर
  • रेखावृत्तीय विस्तार ६८ ७'३३" पूर्व रेखावृत्त ते ९७ २४'४७" पूर्व रेखावृत्त आहे.
  • शेजारी राष्ट्र : पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, चीन, अफगाणिस्तान ,श्रीलंका ,म्यानमार.
  • जलभाग:  पूर्व बंगालचा उपसागर पश्चिम अरबी समुद्र दक्षिण हिंदी महासागर.
  • क्षेत्र: जगाच्या क्षेत्रफळाचे एकूण 2.4%
  • 38 लाख 84 हजार 262 चौरस  किलोमीटर 
  • उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी
  •  पूर्व - पश्चिम  रुंदी २९३३ किलोमीटर 
  • भूसरहद १५२०० किलोमीटर
  • समुद्रकिनारा ६१०० किलोमीटर
  • २९ राज्य आठ केंद्रशासित प्रदेश


No comments:

Post a Comment